राजकारण

कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …

Read More »

खुषखबर: अंतिम वर्षाच्या परिक्षा नाहीच मात्र ATKT चा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांची परिक्षा घ्यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा न देता अभ्यासक्रमाचे पदवी (डिग्री) …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील गावाची बातमी केली म्हणून पत्रकारावर गुन्हा scroll.in च्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे तेथील लोकांवर उपासमारीची वेळ आल्याची बातमी प्रसिध्द केली म्हणून scroll.in या संकेतस्थळाच्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यातील डोमरी या अनेत गावात …

Read More »

मोदीजी, महागाईने सामान्य जनतेचे चिपाड झाले, अजून किती पिळणार? पेट्रोल-डिझेलचा समावेश GST अंतर्गत करा; सध्याची दरवाढ त्वरीत मागे घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सहा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वारंवार कमी होत असतानाही त्याचा लाभ मोदी सरकारने सामान्य जनतेला दिलेला नाही. उलट सलग तेरा दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या जात असून जनतेची लूट थांबवण्याचा मोदी सरकारचा मानस दिसत नाही. आधीच कोरोनाचे संकट व त्यात महागाईने पिचलेल्या पिळून पिळून रस काढलेल्या उसाप्रमाणे …

Read More »

शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद, राम मंदीराचा निकाल ही शिवनेरीवरील मातीचा परिणाम ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी साधला नेत्यांशी संवाद

मुंबई: प्रतिनिधी शिवनेरी किल्ल्यावरील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. मात्र शिवनेरी किल्ल्यावरची माती घेवून मी अयोध्येला गेलो. तर वर्षभरात मंदीराचा निकाल लागला. राज्याचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असून ही सगळी कमाल शिवनेरीवरील मातीची असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय विश्वास ठेवणे ही …

Read More »

कोरोनाचा धोका : मोफत तांदूळ व डाळ वाटण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रती शिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम …

Read More »

पूर परिस्थिती टाळण्यासाठी फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरीय बैठक घ्या

मुंबई: प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली या भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीने मुख्यमंत्रीस्तरिय बैठक घेऊन विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करावा अशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केली. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये गेल्यावर्षी आपण प्रचंड मोठ्या …

Read More »

खाजगी-सरकारी नोकरी पाहिजे, कामगार पाहिजे या संकेतस्थळावर नाव नोंदवा एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती: कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल …

Read More »

बैठक तर झाली पण आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती तोडगा लवकरच निघेल अशी काँग्रेस नेत्यांना आशा

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे खाती नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत असलेली नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नेत्यांचे म्हणणे ऐकत यासंबधीचा निर्णय नंतर कळविणार असल्याचे …

Read More »

मूळ गावी गेलेला तो परत येतोय, राज्यात…पण क्वारंटाईन होवून सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद, थर्मल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता …

Read More »