राजकारण

अजित पवार यांची सूचना, केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करा

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’ वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्द‍िष्ट आहे. हे उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रिलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची खोचक सूचना…तर दिवाळीसाठी गरिबांना हजार रुपये द्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या दिवशी दिवाळी साजरी करण्यावरून दिला खोचक सल्ला

२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत भाजपाचे आणि भाजपाशी संबधित विविध संघटनांचे कार्यकर्त्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी जात अक्षता वाटप करत त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आव्हान जनतेला करत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, … चुका मान्य करता, मग गुन्हा दाखल का केला नाही?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड केला. अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीतही चुका झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे तरीही अद्याप संबंधित दोषींवर गुन्हा दाखल केलेला नाही. इंजिनिअरिंग व फार्मसीसारख्या विभागात असा सावळा गोंधळ होत असेल तर कोणतीही कंपनी महाराष्ट्रातील …

Read More »

मुस्लिम संघटनांची मागणी, राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राजकारण करू नका जमाते ए-इस्लामी संघटनेने केली मागणी

देशातील असंख्य भारतीय हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. मात्र या राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे राजकियकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाचा उपयोग भाजपाकडून त्यांच्या एका राजकिय साधणाचा वापर करत असल्याचा आरोप जमात ए-इस्लामी संघटनेने करत राम मंदिराच्या …

Read More »

छगन भुजबळ यांचा सवाल, जेसीबी, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करणारे गरीब का?

सरसकट ओबीसी मध्ये संपूर्ण मराठा समावेश हे कदापिही शक्य नाही. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही तर वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या मागासवर्गीयांना सामजिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते स्वतंत्र द्या, ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही …

Read More »

१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण…

कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय आयोगाच्या निष्कर्शानुसार रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या …

Read More »

कपिल पाटील यांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयात…

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय दि. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला. परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत निर्णय झालेला नाही, याकडे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पत्र देण्यात आले …

Read More »

वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा …

Read More »