राजकारण

एकनाथ खडसे यांचे खुले आव्हान, भरचौकात मला जोड्याने मारा नाही तर मी तुम्हाला.. गिरीष महाजन यांच्या टीकेवरून खडसे यांनी दिले आव्हान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदान एकनाथ खडसे यांना जळगावात हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याची माहिती पुढे आली. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी एकनाथ खडसे यांचे प्राण वाचावे आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या उद्देशाने एअर अॅब्युलन्सची उपलब्ध करून दिली. त्यानंतर भाजपाचे आमदार तथा मंत्री गिरिष …

Read More »

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …

Read More »

संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरीत

राज्यातील काही भागात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे संभाव्य टंचाई निवारणार्थ राज्य शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाणी टंचाई जाणवत असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर सुरु असलेल्या जिल्ह्यांना एकूण १९.५३ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना …

Read More »

सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामास निधी

हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र टप्या-टप्याने विकसित करण्यात करावे. पहिल्या टप्प्यात बोटिंग आणि उद्यान विकसित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयात आयोजित बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पण राज्यातील भाजपा सरकारला त्याची …

Read More »

संविधान दिन ऑनलाईन इव्हेंट सांसदीय कार्यमंत्रालयाचे आवाहनः फोटो काढा अन् अपलोड करा

देशात २०१४ साली भाजपाप्रणित नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने भाजपा आणि केंद्र सरकारकडून फोटो काढा आणि त्यांनी दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर नागरिकांनी फोटो काढून पाठवा असे आवाहन करण्यात आले. मात्र यावर्षी ७३ व्या संविधान दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी रोजीचा संविधान दिनीही ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला …

Read More »

बागेश्वर बाबासमोर नतमस्तक होत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन म्हणजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी नेते भयभीत आहेत असे सांगतानाच ,काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस जर गांभीयाने घेत नसेल तर त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्रत्येक एस.टी स्टँडवर मिळणार “या” महिलांना स्टॉल एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला निर्णय

राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे भारतात परतताच म्हणाले, ३४ वर्षाची माझी इमेज… संजय राऊत यांच्या फोटो ट्विटवरून दिले प्रत्युत्तर

मागील दोन तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीन मधील मकाऊ दौऱ्यातील एक फोटो ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच या दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचे २२ फोटो आणि १० व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. त्यावर भाजपाने शिवसेना …

Read More »