राजकारण

शरद पवार यांचे मिश्किल विधान, कोणत्याही घटनेमागे फक्त एकाच व्यक्तीचे नाव पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगले झाले राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली गेली

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अडीच तीन वर्षापूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधी मागे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे विधान केले. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेतली होती, …

Read More »

गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रु. आनंदाचा शिधा दिवाळी प्रमाणे या दोन्ही दिवशी शिधा वाटपाचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व …

Read More »

शिंदेच्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव राष्ट्रवादीचा, दुसरा ठाकरेंचा आणि तिसरा भाजपाचा जूनेच ठराव नव्या शिवसेनेच्या कार्यकारणीत मंजूर

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उठाव करत भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाणचिन्ह देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेची आज पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. मात्र या बैठकीत …

Read More »

अजित पवार-आदित्य ठाकरेंच्या रँलीने भाजपा विरूध्द आघाडीत अटीतटीची लढत शिवसेनेला संपविणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करा

मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार चिंचवडची जागा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही आग्रही होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली. मात्र आता भाजपाचे आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकिट दिल्याने जगताप यांच्या बाजूने …

Read More »

केंद्रीय मत्स्य मंत्री रूपाला यांची घोषणा, मच्छिमारांसाठी एनडीआरएफचे निकष बदलणार मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …

Read More »

संजय राऊत यांचा आरोप, खा श्रीकांत शिंदेंनी कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह यांना पत्र लिहून दिली माहिती

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना …

Read More »

भगतसिंग कोश्यारींचा दावा, त्या १२ आमदार नियुक्तीच्या पत्रातून उध्दव ठाकरेंनी दिली होती धमकी अन्यथा त्याचवेळी महाविकास आघाडीचे आमदार नियुक्त झाले असते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील पत्र युध्द चांगलेच रंगले होते. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवरूनही अनेक वेळा प्रश्न निर्माण झाले. मात्र त्यावेळी १२ आमदार नियुक्तीच्या मुद्यावरून त्यावेळी चकार शब्दाने न बोललेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,… तरुणांच्या पदरी निराशा टाकण्याचे पाप करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा

MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या …

Read More »

फडणवीसांची टीका, संजय राऊत हे निर्बुध्द… तर उद्धव ठाकरेंकडे ठराविक शब्दांची ‘डिक्शनरी’ एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारचा सातत्याने पाठपुरावा

उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुणे येथे आगमन झाले असता ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांमध्ये दिलेल्या विधानांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस बोलत …

Read More »