राजकारण

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात भाजपा आमदार नितेश राणे यांचे आवाहन

राज्यातील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही आ. राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

विषय कामगारांच्या लग्न तुटण्याचा पण देवेंद्र फडणवीसांनी जोडला आदित्य ठाकरेंच्या लग्नाशी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना हजरजबाबी उत्तर

राज्याचे अधिवेशन सुरु होऊन शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून एकमेकांना चिमटे आणि टोप्या उडविण्याचे प्रकार तसे कमीच पाह्यला मिळाले. परंतु दर अधिवेशनात विरोधी बाकावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी बाकावरील भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांच्या टोप्या उडविण्यात येतात. परंतु आज चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …

Read More »

ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने …

Read More »

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा, आता थेट घरापर्यंत वाळू, गायरान जमिनीवरील घरांवर कारवाई नाही नगरपालिकांसाठी आता दोन तहसीलदार

राज्यातील बहुचर्चित वाळू लिलाव प्रक्रियेवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच अवैध वाळू उपशामुळे शासनाचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या अवैध वाळू उपशाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर गाड्या घालून जीवे मारण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाळू लिलाव प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची नोकरभरती पाच महिन्यात पूर्ण करणार ६६७ पदे लवकरच भरणार- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची घोषणा, तासिका तत्वाच्या मानधन वाढीसह हि पदे भरण्यास मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवेदनाद्वारे विधिमंडळात माहिती

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वित्त विभागाने …

Read More »

लव्ह जिहाद प्रकरणी अबु आझमी यांनी दाखल केला मंत्री लोंढांच्या विरोधात हक्कभंग चार महिन्यांत एकही प्रकरण नाही खोटारड्या लोढांना मंत्रिपदावरून हटवा!

राज्यात लव्ह जिहादच्या एक लाख प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. मात्र त्यांच्याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरपासून लव्ह जिहादचे एकही प्रकरण घडलेले नाही. त्यामुळे लोढा हे खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले असून त्यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे …

Read More »

सरकारी कर्मचारी संघटनेच्या संपाचा तिढा सुटलाः मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली माहिती

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू, याचा लाभ कोणाला? कागदपत्रे सादर करत यामागे कोण याचा खुलासा करण्याची मागणी

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण …

Read More »