राजकारण

छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …

Read More »

शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे विमा कंपन्या व सरकारकडून शेतकऱ्याला तातडीने मदत मिळेल हे सुत्र सरकार ठेवणार का ? बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या वतीने व पीकविमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु पीकवीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १०० रुपये, १२८ रुपयांचे धनादेश मिळाले आहेत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून विमा कंपन्या व राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याला …

Read More »

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला हा सल्ला लॉकडाऊन लावला होता विसरू नका

राज्यात कोरोना संख्या नियंत्रणात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. मात्र मागील काही दिवसांपासून चीन, अमेरिका कोरियासह अन्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठविले असल्याची माहिती पुढे आली. या पत्राचा अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

कोंबडी शब्दावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळः भुजबळांनी शब्द मागे घेतला अजित पवारांनीही व्यक्ती केली दिलगिरी

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारी मुंबईप्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कोंबडी असा शब्द प्रयोग करताच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. दुपारच्या सत्रात मुंबईवरील चर्चेच्या वेळी छगन भुजबळ हे बोलायला …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची माहिती, शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखणार विधान परिषदेत दिली माहिती

शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत …

Read More »

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शहरातच मुलीचा दुर्दैवी मृत्यूः अजित पवारांनी धरले धारेवर व्हेंटीलेटरअभावी अंबूबॅग दाबून वीस तास कृत्रीम श्वासोच्छवास देणाऱ्या आई-वडीलांसमोरच मुलीचा मृत्यू होणे ही दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब

राजकारणातील सध्या हुकमी एक्का असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते …

Read More »

नाना पटोलेंची टीका, कर्नाटक सरकारच्या दादागिरीवर ईडी सरकारची अळीमिळी गुपचिळी केंद्र सरकार व भाजपाच्या आशिर्वादानेच कर्नाटक सरकारची दंडेली..

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी...

घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार भूमिका घेता का? अखेर प्रश्न राखून ठेवण्याची राज्य सरकारवर आली पाळी

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास सुरु होताच विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी ताराकिंत प्रश्न आपण पाठविला होता. मात्र त्यातील प्रश्नाशी संबधित असलेले दोन मुद्दे परस्पर वगळले. हे मुद्दे का वगळले असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अजित पवार यांनी  करत हा मुद्दा आपण …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक निकालात काँग्रेस, भाजपाकडून नंबर वनचे दावे ९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, …

Read More »