इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तींची संख्या दहा वरून पन्नास करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. २०२२-२३ या चालू वर्षापासून त्याचा लाभ मिळेल. …
Read More »ठाकरेंच्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देत दिला निकाल
राज्यातील सत्तासंघर्षावरील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या एकाही याचिकेवर निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मागील सुनावणीवेळी एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दिवसभर सुनावणी घेत शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेसह जवळपास चार याचिका …
Read More »सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वन कर्मचाऱ्यांनाही मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्य़जीव ही वन संपत्ती फार महत्वाची आहे. …
Read More »न्यायालयात सुनावणी सुरु असताना उध्दव ठाकरे म्हणाले, कितीही अफजलखान आले तरी… ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या ते खोक्यात गेले
राज्यातील शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळपासून सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर पुढील सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचा याचिकांवर निकाल द्यावा मात्र शिवसेनेबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाने घ्यायला परवानगी द्यावी यावरून मागणी …
Read More »उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बाळासाहेबांचे विश्वासू सेवेकरी थापा एकनाथ शिंदे गटात शिंदे गटात गेल्यानंतर थापा म्हणाले, प्रत्येकाची विचारधारा वेगळी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उध्दव ठाकरे यांची साथ सोडत आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा …
Read More »१ हजार १६५ ग्रामपंचायतीसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मुनगंटीवार, सामंत यांचा गुजरात दौरा गुजरातच्या सि.एम. डॅशबोर्ड चा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अहमदाबाद दौरा
राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार प्रत्यक्ष कोण चालवतो यावरून सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राज्याचा गाडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चालवित असल्याचा आरोपही करण्यात येतात. आता या आरोपांना पुष्टी देणारी एक घटना नुकतीच पुढे आली आहे. राज्याचे वनमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी …
Read More »५ हजारांचे प्रशिक्षण सुरु तर ७ हजाराची प्रक्रिया सुरु तर १० हजाराची पोलिस भरती लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
राज्यामध्ये सध्या सन २०१९ मधील ५ हजार २९७ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन २०२० मधील ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या …
Read More »वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »भाजपाचा सवाल, ‘पीएफआय’ वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेवर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे देशात धार्मिक विद्वेष आणि दहशतवाद माजविण्याचा कट उघड झाला असून देशाच्या लोकशाही व सामाजिक सलोख्याशी तडजोड नाही हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी क्षुद्र राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेबाबत सर्व राजकीय पक्षांचे ऐक्य असल्याचे दाखवून द्यावे, असे …
Read More »
Marathi e-Batmya