राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक जाहिर झालेली असताना आणि त्यातच राज्यातील १४ महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेंच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आता मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणूकाही कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला. मात्र आज बोरिवलीतील एका उड्डणापुलाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, तो चमत्कार तर घडणारच चमत्कार कोणाच्या बाबत घडेल ते उभा महाराष्ट्र बघेल
चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, केंद्रीय यंत्रणांकडून आमदारांना थेट फोन… केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्यास भाग पाडू; काँग्रेस पक्ष तरुणांसोबत
भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा डिफेन्स; ‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने तरुणांचे करिअरचे कायमचे नुकसान
लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, अशी जाणीव भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी करून …
Read More »भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कशाला पराचा कावळा करताय… असं बोलत असतात असे सांगत दुर्लक्ष करण्याचे आवाहन
विधान परिषद निवडणूकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या दगाफटक्याची पुर्नरावृत्ती होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना …
Read More »निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार भुयार यांचा टोला, संजय राऊतांना मतपेटी… राऊतांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भुयार यांनी लगावला टोला
काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीतील मते फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची नावे घेत यांचीच मते …
Read More »अग्निपथच्या अग्नीरोषावर संजय राऊत म्हणाले, ठेकेदारीवर गुलाम घेता येवू शकतं पण सैन्य… पंतप्रधान मोदींची प्रत्येक योजना…हा तर सैन्यदलाचा अपमान
मागील काही दिवसात केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत लष्कर भरतीसाठी कंत्राटी पध्दतीची अग्निपथ ही योजना जाहिर करण्यात आली. मात्र या योजनेच्या घोषणेनंतर अग्निपथच्या विरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तरूणांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आपला रोष अग्निचा …
Read More »‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो
नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि …
Read More »नोटीस बजाविल्यानंतर नुपूर शर्मा गायब; मुंबई पोलिस घेतेय शोध रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नुपूऱ शर्मा यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले. मात्र, अद्याप नुपूर शर्मा मुंबई पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्या कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या …
Read More »राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा
केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाहीविरोधात …
Read More »
Marathi e-Batmya