प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदींनी भारताला रेल्वे अपघाताची राजधानी बनविली रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

रेल्वे अपघातात मौल्यवान जीव गेले आणि कितीतरी जखमी झाले. गेल्या काही वर्षांत जवळजवळ प्रत्येक महिन्यात रेल्वे अपघाताच्या घटना होत आहेत. पंतप्रधान मोदींनी भारताला जगातील रेल्वे अपघाताची राजधानी बनविल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

पुढे बोलताना ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी सरकारकडून फक्त जाहिराती केल्या जातात पण, जबाबदारी पार पाडली जात नाही, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. गेल्या दोन वर्षांत पूर्वोत्तर भागात मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात आता आणखी एका अपघाताची भर पडली आहे. हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकली. या अपघातात दोन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त केला.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *