रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, भाजपाची लोकाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहोचवा प्रवक्ता कार्यशाळेत बोलताना केले मार्गदर्शन

भाजपा परिवाराच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार तसेच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुख यांच्या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते.

यावेळी प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, प्रदेश सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान, नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्यासह प्रदेश प्रवक्ता, विभागीय प्रसिद्धी प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यशाळेचा समारोप करताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सध्याच्या एआयसहित सर्व तंत्रज्ञान आधारित मीडियाचा आधार घेण्याचे आवाहन प्रवक्त्यांना केले. सखोल वाचन करतानाच विशेषत: शासनाचे सकारात्मक निर्णय समजून घेत त्याची मांडणी जनतेसमोर केली पाहिजे. संवादक या भूमिकेतून प्रवक्ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.

 

About Editor

Check Also

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम • १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे • दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *