राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनंतर शिवसेना उबाठा पक्षाने जवळपास दुसरी आणि तिसरी यादी जाहिर जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर मुंबई आणि ठाणेसह इतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना ए बी फॉर्मचे वाटपही आज शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर केले.
दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत शिवसेना उबाठा गटाने मुंबई आणि ठाणेतील बहुतांष जागांवर उमेदवार जाहिर केले. तर दुपारी ट्विटरवर आणखी तीन उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली. शिवसेना उबाठा पक्षाने पहिली ६५ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली होती. त्यानंतर आणखी १५ उमेदवारांची यादी आज शिवसेनेच्या मुखपत्रातून तर तीन उमेदवारांची नावे ट्विटरच्या माध्यमातून जाहिर करण्यात आली.
मागील निवडणूकीच्या वेळी अनिल गोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मात्र काल अनिल गोटे यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रात्री उशीरा अनिल गोटे यांचे नाव धुळे विधानसभा मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आले. याशिवाय विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा संगिता घोसाळकर यांना शिवसेना उबाठा गटाने मागाठाणे साठी एबी फॉर्म देत दोघांपैकी कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यांनी घ्यायचा असल्याचे सांगत उमेदवारीचा निर्णय घोसाळकर सासरे आणि स्नुषा संगिता यांच्यावर सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना उबाठा पक्षाची जाहिर झालेली यादी खालीलप्रमाणे
चाळीसगांवः उन्मेश पाटील
पाचोराः वैशाली सुर्यवंशी
मेहकर अ.जा- सिद्धार्थ खरात
बाळापूरः-नितीन देशमुख
अकोलाः गोपाल दातकर
वाशिम अ.जाः डॉ सिद्धार्थ देवळे
बडनेराः सुनिल खराटे
रामटेकः विशाल बरबटे
वणीः संजय देरकर
लोहाः एकनाथ पवार
कळमनुरीः डॉ संतोष टारफे
परभणीः डॉ राहुल पाटील
गंगाखेडः विशाल कदम
सिल्लोडः सुरेश बनकर
कन्नडः उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्यः किशनचंद तनवाणी
संभाजी नगर (पश्चिम अ.जा)ःराजू शिंदे
वैजापूर ः दिनेश परदेशी
नांदगांवः गणेश धात्रक
मालेगांव बाह्यः अद्वय हिरे
नाशिक मध्यः वसंत गीते
नाशिक पश्चिमः सुधाकर बडगुजर
पालघर (अ.ज)ः जयेंद्र दुबळा
बोईसर (अ.ज)ः डॉ विश्वास वळवी
निफाडः-अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अ.ज)ः महादेव घाटळ
अंबरनाथ (अ.जा)ः राजेश वानखेडे
डोंबिवलीः दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीणः सुभाष भोईर
ओवळा माजीवडाः नरेश मणेरा
कोपरी पाचपाखडीः केदार दिघे
ठाणेः राजन विचारे
ऐरोलीः एम के मढवी
मागाठाणेः उदेश पाटेकर
विक्रोळीः सुनिल राऊत
भांडुप पश्चिमः रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्वः अनंतर (बाळा) नर
दिंडोशीः सुनिल प्रभू
गोरेगांवः समीर देसाई
अंधेरी पूर्वः ऋतुजा लटके
चेंबूरः प्रकाश फार्तेपेकर
कुर्ला (अ.जा)ः प्रविणा मोरजकर
कलिनाः सजंय पोतनीस
वांद्रे पूर्वः वरूण सरदेसाई
माहिमः महेश सावंत
वरळी आदित्य ठाकरे
कर्जतः नितीन सावंत
उरण ः मनोहर भाईर
महाडः स्नेहल जगताप
नेवासाः शंकरराव गडाख
गेवराई ः बंदामराव पंडीत
धाराशिवः कैलास पाटील
भूम-परांडाः राहुल पाटील
बार्शी ः दिलीप सोपल
सोलापूर दक्षिणः अमर रतिकांत पाटील
सांगोलाः दिपक आबा साळुंखे
पाटणः हर्षद कदम
दापोलीःसंजय कदम
गुहागरःभास्कर जाधव
रत्नागिरीः सुरेंद्रनाथ (बाळा) माने
राजापूरः राजन साळवी
कुडाळः वैभव नाईक
सावंतवाडीः राजन तेली
कुडाळः वैभव नाईक
राधानगरीः के पी पाटील
शाहुवाडीः सत्यजीत आबा पाटील
शिवडीः अजय चौधरी
धुळे शहरः अनिल गोटे
चोपडाः राजू तडवी
जळगांव शहरः जयश्री सुनिल महाजन
बुलढाणाः जयश्री शेळके
दिग्रसः पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोलीः रूपाली राजेश पाटील
परतूरः आसाराम बोराडे
देवळालीः योगेश घोलप
कल्याण पश्चिमः सचिन बासरे
कल्याण पूर्वःधनंजय बोडारे
वडाळाः श्रध्दा श्रीधर जाधव
भायखळाः मनोज जामसुतकर
श्रीगोंदाः अनुराधा राजेंद्र नागवडे
कणकवलीः संदेश भास्कर पारकर
वर्सोवाः हारून खान
घाटकोपर पश्चिमः संजय भालेराव
विर्लेपार्लेः संदीप नाईक
मागाठाणेः विनोद घोसाळकर आणि संगिता घोसाळकर यांना एबी फॉर्म दिला. निवडणूक कोणी लढवायची याचा निर्णय दोघांनी मिळून घ्यायचा
Marathi e-Batmya