हरियाणात बाजू पलटता पलटता राहिलीः काँग्रेसची आघाडी भाजपाकडे महिला कुस्तीपटू विनेश फोगाट झाली विजयी

लोकसभा निवडणूकीनंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या. या निवडणूकांच्या माध्यमातून केंद्रातील भाजपा जम्मू काश्मीर आणि हरियाणातील सत्ता पुन्हा काबीज करेल का याची चर्चा देशात चांगलीच रंगली होती. मात्र हरियाणातील मागील १० वर्षाच्या कालखंडात तेथील शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपा सरकारने घेतली भूमिका, तसेच दिलेली वागणूक, तसेच भाजपाच्या विरोधात असलेली अंतोषाची भावना त्यामुळे भाजपा हरियाणात पुन्हा जिंकेल अशी शक्यता तमाम एक्झिटपोल वाल्यांनाही वाटत नव्हती. तसेच विधानसभेच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होताच सुरुवातीचे दिसून आलेले पाहता पूर्ण बहुमताने काँग्रेस हरियाणात परतेल असे चित्र निर्माण झाले. मात्र दुपारी १२ पर्यंत सत्तेचे पान पलटता पलटता हरियाणात भाजपाच पुन्हा सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अर्थात एक-दोन महिने आधी ऑलिंम्पिक स्पर्धेत महिला खेळांडूना मिळालेली वागणूक, त्यातच भाजपाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंग यांने विन्गेश फोगाट विषयी केलेले वक्तव्य यामुळे याचा भाजपाला सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता व्यक्त झाली होती. याशिवाय हरियाणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुडा आणि माजी केंद्रीय मंत्री शैलजा यांच्यात निर्माण झालेला राजकिय वाद शमविण्यात मध्यस्थी केली. तसेच हरियाणा विधानसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी हरियाणातील अनेक बेरोजगार युवक रोजगाराच्या निमित्ताने अवैधरित्या अमेरिकेला कसे जातात हा मुद्दा प्रकर्षनाने निवडणूकीच्या प्रचारातही आणला. त्या मुद्यावर भाजपानेही छुप्पी साधली. त्यामुळे हा मुद्दा भाजपाला भारी पडेल असे बोलले जात होते.

मात्र आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन ते पाच फेऱ्या पर्यंत हरिणाच्या जवळपास ५०-६० जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे १० वर्षानंतर काँग्रेस हरियाणा पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच विविध संस्थांच्या एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काँग्रेस पूर्ण बहुमातात पुन्हा हरियाणात परतणार असल्याच्या निकालाचे चित्र रंगविले.

परंतु पाचा फेऱ्यानंतर काँग्रेसचा ५० हून अधिक विधानसभा मतदारसंघात असलेली आघाडी कमी होण्यास सुरुवात झाली आणि तीच आघाडी भाजपाच्या दिशेने जाऊ लागली. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूनं सुरु झालेला ट्रेंड भाजपाच्या बाजूने वळायला सुरुवात झाल्याने संपूर्ण वातावरणच पलटायला लागले. त्यातच हरियाणाचे विद्यमान मुख्यमंत्री सैनी हे ही पराभवाच्या छायेत होते. ते ही नंतर विजयाच्या दिशेने घौडदौड निर्माण झाली.

दुपारनंतर हरियाणातील विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी भाजपाने ३९ जागी विजय मिळवित १० विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. तर काँग्रेस ३१ जागांवर विजय मिळवित ५ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपा हरियाणा राज्यात तिसऱ्यांदा सत्तास्थानी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात वातावरण असूनही आणि शेतकऱ्यांना चुकीची वागणूक देऊन सुद्धा येथील शेतकरी आणि जनता पुन्हा एकदा विद्यमान सरकारला मतदान करू शकते हा नवा राजकारणाचा ट्रेंड पुन्हा एकदा सेट झाल्याचे दिसल्याचे स्पष्ट झाले.

निकाल सविस्तर पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील लिंकला भेट द्याः

https://results.eci.gov.in/AcResultGenOct2024/partywiseresult-S07.htm

About Editor

Check Also

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी डॉ प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *