२ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान ३ हजार ८० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती “आपली बस, आपली सेवा” १ मे पासून एसटीचे नवे अभियान एसटी बसेसची संख्या वाढतेय, तरी प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही

महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *