क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता महिला शिक्षण दिन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दिनांक तीन जानेवारी हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणे, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल. ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील आणि समाजमाध्यमांवर मी सावित्री, महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल. अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *