अभिजीत दीपके यांचा निर्धार, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही आंदोलनासाठी मी तुरुंगात गेलो तरी पुन्हा येईन, पुन्हा येईन

मतचोरी प्रकरणी इंग्रजी वर्तमान पत्र द इंडियन एक्सप्रेस मध्ये यासंदर्भातील वृत प्रकाशित होत निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांचा विरोध असतानाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने एसआयआर आणि मतदारांची नावे डिलीट केली. त्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह जेन झीनेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. हे आंदोलन मुंबईत करण्याचा निर्णय कॉकरोच जनता पार्टीने घेतला असून आंदोलनात उद्या 2 ऑक्टोंबर पासून करण्यात येणार असल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार च्या विरोधात कॉक्रोरोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रमुख अभिजीत दीपके यांनी सांगितले की, मुंबईपासून आंदोलन सुरु करत आहोत, हे आंदोलन बेंगलोर, गोवा, कोलकत्ता, पटणा, रांची आदी देशातील अनेक ठिकाणाहून होणार असल्याचे सांगितले.

मुंबईतील प्रेस क्लब येथे दुपारी आयोजित केलेल्या वार्तालापात अभिजीत दीपके यांनी सांगितले की, निवडणूक यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला होता, आज मात्र उलटे होत आहे. सरकार मतदार ठरवत आहे. मोदी-शाह घरात बसून यादी ठरवत आहेत. ते आता होवू देणार नाही. या पूर्वीची मतदार यादीच अंतिम करून निवडणूक झाली पाहिजे. नवीन मतदार नोंदणी पारदर्शक व्हावी, निवडणूक आयुक्त ठरविताना त्यात लोकांचा प्रतिनिधी असायला हवा. १३ हजार मतदार वगळले गेले ते सर्व रस्त्यावर उतरतील. जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर जंतरमंतर वर पुन्हा आंदोलनाला बसावे लागेल. तेव्हा मात्र राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना अभिजीत दीपके यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानगी नाकारली, गांधी टी शर्ट घाला आणि भरपूर खाऊन या असे आवाहन करत या आंदोलनाला पोलीसांनी परवानगी नाकारली असली तर आमचा हक्क आहे, आम्ही आंदोलन करणारच, या ताणाशाही विरोधात देशात राग आहे. आंदोलनाला येताना गांधी टी शर्ट घाला आणी भरपूर खाऊन या, त्यामुळे लढण्यासाठी भरपूर उर्जा राहील. राज ठाकरे यांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता आमच्या आंदोलनात कोणीही येवू शकता, पण फक्त तिरंगा हातात असला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

अभिजीत दीपके पुढे बोलताना म्हणाले की, शिवाजी पार्क मैदानावरील सहा नंबर गेटवर आमचे आंदोलन होणार आहे. या ठिकाणी भाजपच्या रॅलीला परवानगी मिळते, आम्हाला मिळत नाही, असे वेगवेगळे कायदे कसे काय असू शकतात असा सवाल करून आम्हाला तीन महिने जेलमध्ये टाका, मी आंदोलनासाठी ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असा पुर्नरुच्चारही अभिजीत दीपके यांनी केला.

अभिजीत दीपके म्हणाले की, आंदोलन शांततेत होईल, लोक आता आंदोलनाला घाबरत नाहीत असा दावा केला.

शेवटी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, मागील आंदोलनानंतरही सुधारणा झाल्या नाहीत, स्पर्धात्मक परिक्षातील पेपर फुटी प्रकरणी जंतर-मंतरवर आंदोलन झाले, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पण सराकरकडून सुधारणा काहीच झाल्या नाहीत, सरकार काहीच करु शकले नाही. या संदर्भातील पाठपुरावा आम्ही सुरुच ठेवला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेईपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा देत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंजरवर आंदोलन करणार असल्याचेही यावेळी दीपके यांनी जाहिर केले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या विजयासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे बोलले जात असल्याबाबत अभिजीत दीपके यांना विचारले असता ते म्हणाले की, मला कोणी आरएसएसचे म्हटले जाते, कोणी मला कॉग्रेसचा असल्याचे सांगितले जाते, पण आधी मी कुणाचा हे राजकीय पक्षाचा आहे हे आधी ठरवावे असा सल्लाही यावेळी दिला.

 

About Editor

Check Also

आरएसएसचे सुनिल आंबेकर म्हणाले की, लोकसंख्या असमतोल दूर करण्यासाठी आणि अखंडता राखण्यासाठी नागरिकांची ओळख आवश्यक सीएए आणि एनआरसी जणगणनेत करण्याची आवश्यकता

ज्या वेळी मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) सह राजकीय चर्चा रद्द केली जात आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *