पुढील तीन -चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल. येत्या काळात देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण देश रस्त्यावर येऊ शकतो असा खबळबळजनक दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्याचबरोबर पुढील काही काळ असाही येऊ शकतो की, देशाला काही काळ पंतप्रधानच …
Read More »सुरजीत भल्ला यांची माहिती, १३ कोटींपैकी ७० लाख पात्र मतदारांची नावे यादीतून का वगळली? याची माहितीच नाही निवडणूक आयोगाने कोणतेही स्पष्टीकरण न देता ७० लाख मतदारांची नावे वगळली
निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या चर्चेत, १३ कोटी नावे वगळल्याच्या धक्कादायक आकड्यावर मुख्य भर दिला जात आहे. परंतु, यापैकी किती नावे अशा पात्र मतदारांची होती, ज्यांची नावे मतदार यादीत कायम असायला हवी होती? अर्थतज्ज्ञ सुरजीत भल्ला यांनी या प्रश्नाचे उत्तर …
Read More »डिमके प्रमुख एम के स्टॅलिन यांची मागणी, ज्ञानेश कुमार यांना हटवा, मतपत्रिकांचा वापर करा पक्षाच्या बैठकीत केला ठराव मंजूर
डीएमकेने शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची, मतदार याद्यांची विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) रद्द करण्याची आणि मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच, या सुधारणा प्रक्रियेवर काँग्रेस आणि टीव्हीकेवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोपही केला. चेन्नईतील अण्णा अरिवलयम येथे पक्षाध्यक्ष एम के स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत …
Read More »राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना नोटीस या याचिकवरील नोटीस कोणी तरी स्विकारेल अशी व्यक्त केली आशा, राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस
निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आणि कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठाच्यावतीने शिवाजी पार्कवर आंदोलन ठाकरे बंधू रस्त्यावर, 'एक सही संतापाची' मोहीम सुरू
दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढत तेथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मतचोरीची आणि एसआयआरच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच मुद्यावरून मुंबईतही मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला न्यायालयात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने (सुमारे २ किमी अंतरावर) कूच करत आहेत. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत …
Read More »टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक अटकेनंतर तुरुंगात केली रवानगी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी दिल्लीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांना (ज्यामध्ये राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन आणि डोला सेन यांचा समावेश आहे) ताब्यात घेण्यात आले. त्याच सुमारास, ‘आप’ (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री …
Read More »घाबरलेल्या दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या अभिजीत दीपके, रांका, दास यांना विमानातूनच केली अटक मुंबईहून एअर इंडिया विमानाने दिल्लीला पोहोचताच दिल्ली पोलिसांची कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगाच्या संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना एसआयआर वेळी फॉर्म ६ मध्ये न्यायालयाच्या संमतीशिवायच सुधारणा केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही केंद्र सरकारने योग्य तो निर्णय न घेताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने १० ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा नारा सीजेपीने …
Read More »राहुल गांधी यांनी भाजपला स्वतःवरच निशाणा साधण्यासाठी दोन शस्त्रे कशी दिली? एलॉन मस्क यांच्या आरोपावर एसआयआरमधील अनियमततेवरून केला सवाल
सलग तीन दिवस राहुल गांधी यांनी चर्चेची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. ‘एसआयआर’ (SIR) मधील अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या अनपेक्षित आंदोलनामुळे सत्ताधारी भाजप बचावात्मक पवित्र्यात आला होता. त्यानंतर त्यांनी एलॉन मस्क यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली; एलनम्स्मस्क यांनी भारतात ‘स्टारलिंक’च्या व्यावसायिक लाँचिंगबाबत (प्रारंभाबाबत) तीव्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले …
Read More »
Marathi e-Batmya