Ladakh : सैन्याचा ट्रक दरीत कोसळून ९ जवान शहीद दरीत बस कोसळून झाला अपघात

लडाख ( Ladakh) येथे आज, शनिवारी संध्याकाळी भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जवान शहीद झालेत. कियारी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या कारू चौकीजवळच हा भीषण अपघात झाला.

याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या ताफ्यात ५ वाहने होती. तर अपघातग्रस्त वाहनात १० सैनिक होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) ९ जवानांचा समावेश आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे २९ एप्रिल २०२३ रोजी सैन्याच्या रुग्णवाहिका २०० फूट खोल दरीत कोसळून २ जवान शहीद झाले होते. दरम्यान लडाखमध्ये ( Ladakh)  झालेल्या अपघातावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ट्विटरवर जारी केलेल्या संदेशात ते म्हणाले की, लद्दाखमध्ये झालेल्या अपघातात भारतीय सैनिकांच्या मृत्यूमुळे मी दु:खी आहे. वीर जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना आहेत. अपघातातील जखमींना मैदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो असे राजनाथ यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

About Marathi E Batmya

Check Also

झारखंडमध्ये विधानसभेजवळ विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज सरकार आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तीन वेळा चर्चा, मागण्या मान्य करण्याचे आवाहन

झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करणारे हजारो नोकरी इच्छुक सोमवारी विधानसभेजवळ पोलिसांशी भिडले. त्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *