सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज लागणार आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी १० हजार कोटी रूपयांचा निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र हा निधी कमी पडत असल्याने अतिरिक्त १५ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी नव्याने कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील २.८९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या ५२ प्रकल्पांमध्ये विदर्भातील १६ प्रकल्प, मराठवाड्यातील ७ प्रकल्प आणि उर्वरित महाराष्ट्रातील २९ प्रकल्पांचा समावेश राहणार आहे.

About Editor

Check Also

२०२३ मध्ये मुंबई विमानतळावर व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहिर व्हीएसआर व्हेंचर्सच्या लियरजेट ४५एक्सआर विमानाचे अस्थिर लँडिंग

विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) आपल्या अंतिम अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, सप्टेंबर २०२३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *