केंद्राचे राज्यांना आदेश, निर्बंध पुन्हा लावण्याची वेळ.. घरोघरी जावून टेस्ट करा केंद्र सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात पुन्हा एकदा देशात रात्रीची संचार बंदी, नागरीकांच्या एकत्र येणाच्या संख्येवर पुन्हा मर्यादा यासह अन्य कडक निर्बंध लागू करण्याची गरज असल्याचे मत केंद्र सरकारने व्यक्त करत घरोघरी जावून कोरोनाच्या तपासण्या करण्याचे आदेश सर्व राज्य सरकारांना आज दिले.
महत्वाच्या सूचना
कंटोन्मेंट झोन जाहीर केलेल्या भागात फक्त अत्याश्वक सेवा सुरु ठेवणे. तसेच या भागातील नागरीकांना झोनच्या बाहेर जाण्यास बंदी घालणे आदी निर्बध घालण्याबाबत राज्य सरकारने काळजी घेण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे.
तसेच कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांना ७२ तासात शोधून त्यांची तपासणी करून त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवावे.
तसेच बाधितांना तात्काळ उपचार आणि विलगीकरणाची व्यवस्था करून देण्यासंदर्भातील सूचनाही राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.
सारी आणि इली रूग्णांनाही वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासंदर्भातच्या सूचना करून मोबाईल क्लिनिक, फिवर क्लिनिक मोठ्या प्रमाणात सुरु करण्यास राज्यांना सांगण्यात आले.

About Editor

Check Also

पूर्व दिल्लीत इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा गुदमरून मृत्यू पंतप्रधान मोदी यांच्याकडून मदतनिधी जाहिर, घटना पहाटे घडली

लोखंडी जाळ्या, बिघडलेले स्मार्ट डोअर लॉक आणि दाटीवाटीच्या रचनेमुळे पूर्व दिल्लीतील एक निवासी इमारत रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *