एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १८ जानेवारी रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर JEE मेन प्रवेशपत्र २०२५ जारी केले आहे. जेईई JEE मेन २०२५ परीक्षेचे प्रवेशपत्र jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमेदवार नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड यासारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
एनटीए NTA च्या अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in ला भेट द्या
होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘JEE मेन सत्र १ प्रवेशपत्र २०२५’ लिंकवर क्लिक करा
तुमचा JEE मेन नोंदणी आयडी आणि पासवर्ड एंटर करा
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा
JEE मेन २०२५ प्रवेशपत्र डाउनलोड करा
उमेदवारांना परीक्षेची तारीख, शिफ्ट, केंद्राचा पत्ता आणि इतर महत्त्वाच्या सूचना यासारख्या तपशीलांसाठी त्यांचे प्रवेशपत्र काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला दिला जातो.
Release of Admit Cards for the Candidates of JEE (Main)–2025 Session-1 (January 2025) scheduled to appear on 22, 23 and 24 January 2025 – Reg. pic.twitter.com/2ibfSg0fJi
— National Testing Agency (@NTA_Exams) January 18, 2025
एनटीएने सर्व परीक्षा तारखांसाठी परीक्षा शहर स्लिप जारी केली आहे आणि ती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
सत्र १ ची परीक्षा पेपर १ साठी २२, २३, २४, २८ आणि २९ जानेवारी रोजी होणार आहे. पेपर २ ३० जानेवारी रोजी होणार आहे.
जेईई मेन २०२५ ची परीक्षा पेपर १ साठी दोन शिफ्टमध्ये होईल – पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६.३०. पेपर २ साठी, परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होईल – दुपारी ३ ते संध्याकाळी ६.३०.
जेईई मेन २०२५ ची परीक्षा १३ भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षेत दोन पेपर आहेत – पेपर १ (बी.ई/बी.टेक) आणि पेपर २ (बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग). नोंदणी प्रक्रिया २८ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी संपली.
एजन्सी देशभरातील विविध शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १५ शहरांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या केंद्रांवर जेईई मेन्स परीक्षा घेईल.
Marathi e-Batmya