चीनच्या घुसखोरीचा मुद्या राहुल गांधी यांनी उपस्थित करताच संसद दिवसभरासाठी बंद माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे राहुल गांधी यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडवले.

राहुल गांधी यांच्या दिलेल्या संदर्भामुळे दोन तासांत तिसऱ्यांदा संसदेचे कामकाज सुरू झाल्यावर, राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राबद्दलच्या आपल्या विधानांवर पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतल्याने, अखेरीस लोकसभेचे कामकाज दिवसासाठी तहकूब करण्यात आले.

राहुल गांधी यांच्या भाषणामुळे दोनदा कामकाज तहकूब होवून सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा सुरू झाल्यावर, लोकसभेतील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता सभागृहात का उपस्थित नाहीत, असा सवाल केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री आपल्याला बोलू देत नाहीत, हीच गोष्ट दाखवते की ते “अस्वस्थ” आहेत, अशी टीकाही यावेळी केली.

राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात करून पुस्तकातील उतारे वाचायला सुरुवात करताच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना अडवत, ते पुस्तक खरोखर प्रकाशित झाले आहे की नाही याची खात्री करण्यास सांगितले.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे त्यांनी आम्हाला सांगावे. ते प्रकाशित झालेले नाही. ते त्यातून उतारे वाचल्याचा दावा करू शकत नाहीत,” असेही सांगत “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही.”

गृहमंत्री अमित शाह यांनीही यात सहभाग घेत म्हटले, “जेव्हा पुस्तक प्रकाशितच झालेले नाही, तेव्हा ते (राहुल) त्यातून उतारे कसे वाचू शकतात?”

“वृत्तपत्रांतील कात्रणे, पुस्तके किंवा इतर अशा गोष्टी ज्या अस्सल नाहीत, त्यांचा सभागृहात संदर्भ दिला जाऊ शकत नाही,” असे अमित शाह म्हणाले आणि राहुल गांधी यांना पुस्तकाचा संदर्भ न देता आपले भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली.

अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय नियम आणि परंपरांचा हवाला देत मंत्र्यांच्या आक्षेपांना पाठिंबा दिला.

तथापि, राहुल गांधी यांनी आग्रह धरला की ‘द कारवाँ’ मासिकाकडे पुस्तकातील “१००% अस्सल” उतारे आहेत. “त्यात राजनाथजींचा उल्लेख आहे,” असे ते म्हणाले, तर त्यांचे सहकारी काँग्रेस खासदारांनी अध्यक्षांना त्यांना तो लेख वाचण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पुढे म्हटले, “त्यानंतर (सरकार) उत्तर देऊ शकते.”

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुस्तकांमधून, विशेषतः अप्रकाशित पुस्तकांमधून उतारे वाचण्याच्या विरोधातील नियमांचा पुनरुच्चार केला. ओम बिर्ला यांनी यावर जोर दिला, “ते पुस्तक प्रकाशित झाले असले तरी, सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही पुस्तकातून उतारे वाचण्याची परवानगी नाही.” विरोधी पक्षनेत्यांच्या समर्थनार्थ बोलताना, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले की, चीनशी संबंधित मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत आणि राहुल गांधींना या विषयावर बोलण्याची परवानगी दिली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

या आक्षेपानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी व्यक्तत्यविरुद्ध निषेध केला, तर सत्ताधारी बाकांवरील खासदारांनी संसदीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणी केली.

सुमारे ४५ मिनिटांच्या गदारोळानंतर, संसदेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृह तहकूब झाल्यानंतर, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी बैठक घेतली.

About Editor

Check Also

कर्नाटकच्या मंत्र्यांनाच सुट्टे पैसे नसल्याने बसमधून खाली उतरण्यास बस कंडक्टरने सांगितले प्रवाशांच्या दैंनदिन अनुभवाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी केलेली अचानक तपासणी (सरप्राईज इन्स्पेक्शन) त्यांच्यासाठीच एक ‘वास्तविकतेची जाणीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *