आरोग्य विभाग भरती

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविली विभागाकडून मुदतवाढीची घोषणा

आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण २२ सप्टेंबर रोजी रात्रौ ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About Editor

Check Also

सहसचिव सुजाता शर्मा यांची स्पष्टोक्ती, पेट्रोल—डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही अफवांवर विश्वास ठेवू नका

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) सहसचिव सुजाता शर्मा यांनी बुधवारी (२५ मार्च २०२६) सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *