स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या. अखंड …
Read More »सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?
केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, देशातील पहिल्या कचरामुक्त शहराची संकल्पना साकार खासगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प, ·तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ; २८ टन गॅसची निर्मिती
देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भांडेवाडी परिसरात केवा सुस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश
पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील बीकेसी येथे ‘मुंबई टेक विक २०२६’ चे मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून खासदारकीची ऑफर खासदारकी स्विकारण्याऐवजी राज्यात सक्रिय राहण्याचा निर्णय ठाम
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर लगेचच, गुरुवारी सिद्धरामय्या यांनी एक गोष्ट स्पष्ट केली: त्यांची राजकीय वाटचाल अजून संपलेली नाही. आपण राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहू आणि राष्ट्रीय राजकारणात जाण्यात आपल्याला काहीही रस नाही, असे त्यांनी जाहीर केले. राजीनामा सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याने एक महत्त्वाची बाब उघड केली. …
Read More »एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवित केली मागणी
कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे मतही पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीचा प्रयत्न केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा
केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी; तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा
साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी …
Read More »
Marathi e-Batmya