कोळसा वायूकरण (कोल गॅसिफिकेशन) विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निर्णायक टप्पा आहे. केंद्र शासनाच्या धोरणांना पूरक अशी राज्याची धोरणे राबवून विदर्भाला कोळसा वायूकरण आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज लँडस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी द्या केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू
महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब
सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा
‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत (महारेल) करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले …
Read More »अभिजीत दिपके यांची स्पष्टोक्ती, राजकारणाचा रोख आता रोजगार- शिक्षणासारख्या विषयावर येणे गरजेचे छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत
मागील १० ते १२ वर्षात देशाचे राजकारणा हिंदू-मुस्लिम अजेंड्याभोवती फिरत आहे. मात्र या मुद्यामुळे तरूणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आता देशाचे राजकारणाचा रोख बदलून रोजगार आणि शिक्षण सारख्या महत्वाच्या विषयावर येणे गरजेचे असल्याची भूमिका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मांडली. दिल्लीतील जंतर-मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी छत्रपती …
Read More »स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण
नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय, खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता
नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार मानसिक आरोग्य सेवांसाठी स्वयंसेवी संस्थांशी सामंजस्य करारास मंजुरी
राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ‘उडान’ प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दोन स्वयंसेवी संस्थांमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. …
Read More »४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार ४ हजार ७५० रोजगारांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निर्मिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्र शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जबिल तसेच दुबईस्थित आरएसए ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात ४ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४ हजार ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार …
Read More »
Marathi e-Batmya