Tag Archives: एमपीएससी

रोहित पवार यांचा आरोप, भाजप सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटतायत सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे

सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत. जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. रोहित पवार बोलताना म्हणाले की,भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, NEET, TET नंतर MPSC चा पेपरही फुटला तीन वर्षांत महाराष्ट्रातील २८७६४ लघु व मध्यम उद्योग बंद, शिक्षणही बोंबलले आणि नोकऱ्याही गेल्या..

देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता एमपीएससी MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. भाजपा सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता …

Read More »

एमपीएससी कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने स्पर्धा परीक्षा सीबीटी CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. ८ जुलै २०२६ …

Read More »

एमपीएससीकडून महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अर्जाची मुदतवाढ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वाढविली अर्ज करण्याची मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने- एमपीएससी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन १४ मे २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एमपीएससी आयोगाने ९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात (क्र. ०११/२०२६) …

Read More »

एमपीएससी गट-ब परीक्षेत अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना शून्य जागा ; वंचित बहुजन आघाडीचा सरकारला सवाल या पदाकरीता जागाच शिल्लक नाहीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) अंतर्गत ५५२ जागांची भरती जाहीर केली असून PSI, STI आणि ASO पदांसाठी १४ जून २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू आहे. मात्र, या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ

लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार  निर्णय घेण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

असंवेदनशील दृष्टीकोनावरून एमपीएससीला उच्च न्यायालयाने फटकारले दृष्टीहीन व्यक्तींबाबत समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज

अपंग किंवा दृष्टीहीन व्यक्तींबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन बाळगू नका, त्यांच्याबद्दल संवेदनशील आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारा, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच, गुजरातस्थित संपूर्णतः दृष्टिहीन महिलेला एमपीएससीअंतर्गत लिपिक-टंकलेखक पदासाठी तिच्या नोकरीच्या पसंती अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची परवानगी दिली. प्रतिवादी एमपीएससीचा याचिकाकर्तींच्या प्रती दृष्टिकोन अपंग व्यक्तींबद्दल …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मैत्रेयी जमदाडेचा सत्कार एमपीएससीच्या परिक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘महाज्योती’ने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत २०२२-२३ वर्षात घेण्यात …

Read More »

एमपीएससीने केली गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षा योजनेत सुधारणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली सुधारणा

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा …

Read More »