महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ

लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी उपस्थित होते.

यापूर्वी विवेक भीमनवार यांच्याकडे राज्य परिवहन विभागाच्या अर्थात आरटीओच्या आयुक्त पदाची जबाबदारी होती. मात्र आता विवेक भीमनवार यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी करण्यात आली आहे.

 

About Editor

Check Also

विलास तरे यांची मागणी, परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करावे भारताचा परकीय चलन साठ्यात वाढ करण्यासाठी केली मागणी

भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *