रोहित पवार यांचा आरोप, भाजप सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटतायत सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे

सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत. जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

रोहित पवार बोलताना म्हणाले की,भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत,भाजपकडून ज्या राज्यात भाजप सरकार नाही, तिथे पेपर फुटला तर भाजप आंदोलन करत आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन करावं, असे म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, गृहखात्याकडून पेपर फुटला नाही असं सांगत असतील तर त्यांनी लक्षात घ्यावे. आमच्याकडे पुरावे आहेत. त्यासंदर्भात आम्ही गृहखात्याला कागदपत्रे दिली आहेत. पुरावे मिळाले नाहीत,आधीच काहीच झालं नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे,सीईटी परीक्षेबाबत आक्षेप असणाऱ्या विद्यार्थांनी माहिती दिली आहे. पुरावे गोळा करत आहोत. तोपर्यंत काही बोलणार नाही,असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब मोदींना भेटले, युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला आहे. सुप्रियाताई सुळे या अमित शाह यांना भेटल्या,१० ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे-सारंग लखानी  यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत,असे सांगितले.

यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार साहेब एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही,असे म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *