काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …
Read More »जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय
लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …
Read More »काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »विजय वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ असतो का? असा सवाल विधानसभेतील काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आज केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधाने करणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही यावेळी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांचे म्हणणे आपण …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून केली मागणी
महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते …
Read More »पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पियुष गोयल यांच्यावर टीका
काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, फुले चित्रपट करमुक्त करा, शाळा-महाविद्यालयात दाखवा 'फुले’ हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून, एक एका महान पुरोगामी चळवळीचा इतिहास
‘फुले’ हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन, संघर्ष आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी कलाकृती आहे. फुले दाम्पत्याने महिला व वंचित घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यासाठी त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्ष आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि ते फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, देशात दुखवटा… भाजपा नेत्यांना लाज कशी वाटत नाही? अमरावतीत भाजपा नेते आणि मंत्र्यांचे सत्कार सोहळे
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना तंबी, पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर सु-मोटो कारवाई व्ही डी सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला इशारा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्ही डी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२५ एप्रिल) तोंडी नापसंती व्यक्त केली. व्ही डी सावरकरांच्या विरोधात लखनौ न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, भविष्यात त्यांनी अशी कोणतीही टिप्पणी केल्यास त्यांच्याविरुद्ध “सुओ मोटू” …
Read More »
Marathi e-Batmya