काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडतेवर आता भर देण्याची गरज आहे. विरोधकांचा या गोष्टींवर विश्वास आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन लवकरात लवकर बोलविणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्या प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने संसदेने बोलविलेले अधिवेशन हे एक प्रत्युत्तर ठरेल. त्यामुळे आम्हा विरोधकांना आशा आहे आमच्या मागणी प्रमाणे संसदेचे अधिवेशन बोलविले जाईल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

एलॉन मस्क यांचा सवाल, भारताचे खरे मालक मुकेश अंबानी आहेत का? स्टारलिंक इंटरनेट कंपनीला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत

भारतात ‘स्टारलिंक’ (Starlink) इंटरनेट सेवा सुरू करण्यातील नियामक अडथळ्यांवरून एलॉन मस्क यांनी आपली टीका अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *