Tag Archives: ग्रामविकास मंत्री

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी ५० टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या  व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२२ पासून सुधारित किमान वेतन …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा, राज्य महिला आयोगाची संकल्पना बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंदी साठी होणार ठराव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या ८ मार्च २०२५ रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्राम सभा आय़ोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आय़ोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व …

Read More »

जयकुमार गोरे यांच्या सूचना, जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने कोकण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत …

Read More »

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळचे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते. परंतु भाजपात असताना राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्त संघर्ष सुरु झाला अन त्यात त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सुरवातीला सोडावी लागली. त्यानंतर भाजपाही सोडावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद …

Read More »

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान …

Read More »

सर्व जिल्हा परिषदांधील या पदाकरीता १९ हजार ४६० पदांची मेगा भरती; जाहिरात उद्याच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागाकडील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरणेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात …

Read More »