Tag Archives: ठाणे

सिद्धेश्वर नगर -रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई-‘एमएमआर’मध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार, ‘क्लस्टर’ केवळ इमारतींचा नाही; ६ हजार कुटुंबांना हक्काचे घर

मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर …

Read More »

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …

Read More »

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड वर्षात तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार

ठाणे शहराच्या विकासात आणखी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ठाणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा …

Read More »

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, ठाणे ‘मोबिलिटी हब’ तर कल्याण ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित करणार एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी

मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला ‘मोबिलिटी हब’ म्हणून …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे; हरित ठाण्याची वाटचाल बंगळुरू विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर करणार

मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी …

Read More »

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनासह विविध संस्था, व्यक्ती पुढे सरसावले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयही या मदतकार्यात क्यू आर कोडच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी …

Read More »

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, मेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होणार मेट्रो मार्ग-४ व ४ अ, टप्पा-१, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न

मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणे आणि मुंबईसाठी महत्त्वाची ठरेल. २०२६च्या ऑक्टोबरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मेट्रो …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना

ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, तसेच घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू …

Read More »