एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना

ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, तसेच घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, घोडबंदर मार्गावरील गायमुख जवळ रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने इथला प्रवास हा धोकादायक बनला होता. प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पालकमंत्री म्हणून याबाबत वारंवार याबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर त्यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच हा रस्ता तातडीने ब्लॉक घेऊन बुजवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम सुरू केल्याचे समजताच त्यांनी प्रत्यक्ष गायमुख येथे भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, खराब रस्त्याचा भाग पूर्णपणे काढून बेस काढून त्यानंतर इथे डब्लूबीएमने ग्राऊटिंग करावे, त्यानंतर त्यावर डांबर टाकून सगळ्यात शेवटी त्यावर मासटिंग करावे असे निर्देश दिले. तसेच बनवलेले रस्ते दर्जेदार तर होतीलच पण अवजड वाहने जाऊन पुन्हा त्यावर खड्डे पडणार नाहीत. त्यासाठी काही दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दर पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त करूनही पुन्हा तिथे डागडुजी करण्याची वेळ येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र याठिकाणी आता ६० मीटर रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित असून तो पूर्ण झाल्यावर हा प्रश्न राहणार नाही असे सांगत हे काम सुरू करण्यासाठी वन विभाग आणि खाजगी मालकांकडून जमीन अधिग्रहित केली जात असून ते कामही लवकर पूर्ण केले जाईल. मात्र तुर्तास नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी इथे मासटिंगचा वापर करून रस्त्याची डागडुजी करण्यात येत असून, ते करताना इथे साचणारे पाणी साचू नये यासाठी चर देखील बांधण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. जेणेकरून इथे साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होईल आणि तयार केलेला रस्ता सुस्थितीत राहील असे सांगितले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तसेच भविष्यात ठाणे – बोरीवली बोगदा मार्ग, साकेत ते फाऊंटन कोस्टल मार्ग तयार झाल्यानंतर या मार्गावरील ताण नक्की कमी होईल आणि वाहतूक कोंडीमधून नागरिकांना कायमचा दिलासा मिळेल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *