Tag Archives: देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात मिरची पूड फेकून बँकेत लूटीचा डाव पण आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात पकडला गेला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका शाखेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून लुटालूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आले. सूरज भोजराज बोरकर (वय २८) असे या आरोपीचे नाव असून, तो बी.एस्सी. पदवीधर आणि सध्या बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

गणेशमूर्तीच्या भव्यतेपेक्षा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्व असून, गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ मध्ये ते बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी तब्बल १० …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या कुंभमेळ्यातील सीसीटीव्हीवर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार …

Read More »

टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड समवेत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नवीन अणूऊर्जा प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीत वाढ होणार

राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्वाचे निर्णय बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज राज्य अतिथी गृह सह्याद्री येथे पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीत प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी “प्रगती प्रकल्प, ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे मत, समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता

पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून २५० पेक्षा अधिक ट्रक इतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार येवला औद्योगिक क्षेत्रात ₹७६० कोटींची गुंतवणूक; ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना

येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० रुपये कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून  ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले. यावेळी अन्न व नागरी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये (NRC) टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या २ …

Read More »