राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन माहिती घेतली आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभरात आढावा घेण्याचे निर्देश दिले होते,राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील …
Read More »धिरज देशमुख यांची मागणी, दुष्काळाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून SDRF अंतर्गत तातडीची मदत द्या मराठवाड्यासाठी विशेष दुष्काळ निवारण पॅकेज द्या, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कर्ज पुनर्गठन तसेच नवीन पीक कर्जासाठी सर्व बँकांना निर्देश द्या
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा आर्द्रता व खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे गंभीर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, ऊस, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी यांसह सर्व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने …
Read More »पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार, लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद, संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार
मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून, राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांनाच सांगावे १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर काँग्रेस सरकारने ‘मनरेगा’ आणली; फलोद्यान योजना आणली, फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती घडवली, तुम्ही काय केले?
राज्यात कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचे चित्र आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, तो सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे, पण भाजपाचे फडणवीस सरकार अजून अभ्यास करण्यातच मग्न आहे. शेतकऱ्यांचा संताप लक्षात आल्याने शेवटी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत पण त्याचा उपयोग काय? …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे चार निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतले निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो कारशेडसाठी जमीन दिलेल्या मोघरपाड्याच्या १९८ शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप, मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास, धुळे शहर विकास योजनेतील भूखंडावरील आरक्षणात बदल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) बैठकीत दिले निर्देश
राज्यातील उच्च शिक्षणाच्या सुविधा समन्यायी पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात आणि नवीन महाविद्यालये सुरू करता यावीत, यासाठी विद्यापीठांच्या पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंचा समावेश करण्यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) यांची बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा …
Read More »कर्नाटक पॅटर्नच्या धर्तीवर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थापन केली दुष्काळी मंत्रिमंडळ समिती शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मान्सून पाऊसाचा कालवधी संपण्याचा कालावधी अधिकृतरित्या ५ ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वीच मान्सूनच्या पावसाने राज्यातील अनेक भागात उघडीप दिली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हातची पिके जाण्याची शक्यता निर्माण झाली. तर काही ठिकाणी पिके हातची गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;
जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा. तसेच महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरणातंर्गत परदेशातील रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे गणरायाला साकडे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री व सरकारला दे.. राहुल गांधींना स्टँडअप कॉमेडियन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले, गेट वेल सून देवेंद्रजी
राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. …
Read More »
Marathi e-Batmya