महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »या ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोकण विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सुर्यवंशीकडे महिला व बाल विकास आयुक्त पदी नयना मुंडे यांची नियुक्ती
राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. आदिवासी विकास आयुक्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य
औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची शेवटची घोषणा, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत सुटी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya