Mantralay
Mantralaya

या ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोकण विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सुर्यवंशीकडे महिला व बाल विकास आयुक्त पदी नयना मुंडे यांची नियुक्ती

राज्य सरकारने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली  कोकण विभागीय आयुक्त म्हणून झाली आहे. तर  कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नेमणूक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांची बदली महिला आणि बालविकास आयुक्त, पुणे येथे झाली आहे.  समग्र  शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर.  यांची नेमणूक  निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली साखर आयुक्त, पुणे येथे झाली आहे.  तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून   मिलिंदकुमार साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे  यांची बदली सोलापूर महापालिका आयुक्तपदी,  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची बदली आदिवासी विकास आयुक्त, नाशिक येथे तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना  यांची बदली लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे.

About Editor

Check Also

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही महावितरणचा बनावट जाहिरातवर खुलासा

महावितरण अर्थात एमएसईडीसीएल मध्ये तब्बल २३ हजारांवर विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *