Tag Archives: नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून आता काँग्रेस माझ्याविषयी अपशब्द वापरत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टोंक-सवाई माधोपूर (राजस्थान) येथे आयोजित एका विशाल जाहीर सभेत बोलताना केला. काँग्रेसला सत्याची भीती वाटत असून छुपा अजेंडा उघड झाल्याने …

Read More »

शरद पवार यांची भीती, मोदींच्या रूपाने दुसरा पुतीन….

देशाची सत्ता तुमच्या हातात आहे. त्या सत्तेचा वापर कसा केला, आणि देशाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांवर टीका केली पाहिजे, याचा अर्थ आजच्या नेतृत्वाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या उदासीनतेबद्दल बरेच काही सांगून जाते. यामुळेच वंचित बहुजन आघाडीने त्यांना द्वेषपूर्ण, जातीयवादी आणि मौत का सौदागर असे नाव का दिले आहे हे सिद्ध होत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांच्यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या …

Read More »

काँग्रेसचे प्रत्युत्तर, डॉ मनमोहन सिंह यांच्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलेले विधान असत्य …

देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आहे असे डॉ. मनमोहन सिंह यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंह यांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान असत्य आहे. डॉ. सिंह यांच्या विधानातील एक वाक्य घेऊन नरेंद्र मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करुन आपली राजकीय …

Read More »

राजस्थानात नरेंद्र मोदींचे हेट स्पीच; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे १७ तक्रारी मुस्लिम देशातील घुसखोर, हिंदूची मालमत्तेचे पुन्हा वाटप करण्याचा प्रयत्न

देशातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच शिगेला पोहोचत आहे. यापूर्वी केंद्रिय निवडणूक आयोगाने लेव्हल प्लेइंग फिल्डचा घोषणा करत काँग्रेस आणि त्यांच्या प्रचारावर बारकाईने लक्ष्य ठेवण्यास सुरुवात केली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बनसाडा येथील प्रचार सभेत बोलताना काँग्रेसवर त्यांच्या मुस्लिमांविषयीच्या धोरणावर टीका करत प्रचारासभेत मुस्लिम विरोधी वक्तव्य केले. …

Read More »

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस असल्याचे स्पष्ट करणारे ठरले आहे. जनता भाजपाच्या जुमलेबाजीला बळी पडली नाही, १० वर्षांच्या अन्याय काळ ला जनतेने मतपेटीतून उत्तर दिलेले आहे. भाजपा दक्षिण व मध्य भारतात साफ तर उत्तर व पूर्व भारतात हाफ झाली असून …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा आरोप, साहेबजादे हारतील… परदेशातील शक्तींशी हात मिळवणी

२० एप्रिल रोजी राजकीय पक्षांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी त्यांच्याच पक्षाला मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रचाराची जोरात सुरुवात केली. कर्नाटकातील चिक्कबल्लारपुरा येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवित म्हणाले की, भारतातील आणि परदेशातील मोठ्या आणि शक्तिशाली लोकांनी त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची

सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …

Read More »

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, … नरेंद्र मोदींना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही?

मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »