विशेष सवलती आणि बनावट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी पूजा खेडकर यांची ११ जुलै रोजी उर्वरित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे येथील त्यांचा प्रोबेशनरी आयएएसचा कालावधी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. तसेच पूजा खेडेकर यांच्या भरतीच्या गोंधळाच्या परिस्थितीची चौकशी करण्याची …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली माहिती
पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर पब-बार तसेच अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मोहीम सुरू
संपूर्ण महाराष्ट्र अमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. …
Read More »जयंत पाटील यांची टीका, ‘विद्येचे माहेरघर’ ची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ बनतेय सरकारचा नाकर्तेपणा याला जबाबदार
येणाऱ्या प्रत्येक दिवशी पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका हॉटेल आणि मॉलमध्ये तरूण-तरूणी ड्रग्ज घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, फुले वाडा व क्रांतीज्योती फुले यांच्या स्मारक विस्तारासाठी २०० कोटी जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले. विधानभवन पुणे येथे …
Read More »पुण्यातल्या पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी, झाडंही कोसळली १५ झाडं कोसळल्याची प्राथमिक माहिती, वाहतूक कोंडी
अखेर हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानुसार वादळीवाऱ्यासह मान्सूनच्या पावसाने पुण्याला झोडपलं. पाऊस इतका जोराचा झाला की या पावसात पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर अनेक मार्गावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. या मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे जवळपास १५ झाडं उन्मळून पडल्याचे पाह्यला …
Read More »नशेत बापाने दिलेली महागडी गाडी चालवित पोराने दोघांना उडविले, कोर्टाकडून लगेच जामीन
कल्याणी नगर भागात एका रियल इस्टेटमधील बिल्डरच्या पोराने बिअर बार मध्ये बसून आधी दाऊ ढोसली, त्यानंतर बापाने घेऊन दिलेल्या पोर्श्चे या महागड्या गाडीने रस्त्याने जाणाऱ्या एका कपलला धडकही दिली. त्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलाला रूग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. इतके होऊनही बिल्डर्सच्या मुलावर अल्पवयीन असल्या संदर्भातील कलम …
Read More »डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सनातनच्या दोघांना जन्मठेप, तर चार जण निर्दोष
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल पुणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी आज दिला. जन्मठेपीची शिक्षा सुनावलेले आणि निर्दोष सोडलेले चारही जण सनातन संस्थेशी संबधित आहेत. दरम्यान …
Read More »पुणे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराविरोधात तक्रार
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका प्रेस नोटद्वारे म्हटले आहे की, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या प्रचार साहित्यात राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ जाणीवपूर्वक वापरल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांची ही कृती केवळ …
Read More »वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता
राज्य मंत्रिमंडळाने आज (११ मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना …
Read More »
Marathi e-Batmya