राज्यातील नागरिकांना महसूल सेवा सुलभ, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविले जावे. या अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये जनसामान्यांची महत्वपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीदरम्यान दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रालयात झालेल्या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मोठ्या शहरांमध्ये होणार मायक्रो झोनिंग जनतेच्या हितासाठी रेडी रेकनर दरवाढ फेटाळली
सध्याची जागतिक स्थिती व युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात १२ ते १४ टक्क्यांपर्यंतची दरवाढ नाकारली, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. Chanचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि संभाजीनगर यांसारख्या मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये आता ‘मायक्रो झोनिंग’ केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तेचा दर हा …
Read More »भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मंजूरी
भूमि अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापक हे पद रद्द करून परिरक्षण भूमापक असे पद निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ही पदे रद्द करण्यात आलेल्या भूकरमापक संवर्गातून नियमित पदोन्नतीने व विभागीय परीक्षेद्वारे प्रत्येकी ४० टक्के आणि सरळसेवेने २० टक्के या …
Read More »जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती वाढती प्रलंबित प्रकरणे रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून शासनाने आदेश जारी केला आहे. मोजणी प्रकरणांचे निश्चित वेळापत्रक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबईत मिळकतीचे फेरफार आता ऑनलाईन ३० लाख नागरिकांना दिलासा
मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन करताना सांगितले. मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे …
Read More »महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात २०० ‘खासगी भूमापकांची’ नियुक्ती अल्पभूधारकांसाठी मोजणी शुल्कात सवलतीचे संकेत
राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता शासकीय मोजणी कामी ‘खासगी परवानाधारक भूमापकांची’ नियुक्ती करण्यात आली असून, ३० मार्च २०२६ पासून हे भूमापक प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात उभय सभागृहात …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बिनशेती झालेल्या मिळकतींवर अकृषिक कर रद्द विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
राज्यातील बिनशेती झालेल्या मिळकतींवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर आकारण्यात येऊ नये, असा निर्णय १० फेब्रुवारी २०२६ च्या सुधारित निर्णयानुसार घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. तथापि, २००१ पूर्वी झालेल्या रुपांतरणासाठी तेव्हाच्या रेडी रेकनरनुसार एकरकमी रुपांतरण अधिमूल्य आकारण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, संभाजी महाराज समाधीस्थळासाठी अडीच एकर जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, महिनाभरात मुंढवा जमीन प्रकरणी चौकशी अहवाल पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती
पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, राज्याचा महसूल विभाग देशात सर्वोत्तम ठरेल ·योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्र्यांचे कौतुक
महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये विविध लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. या माध्यमातून होत असलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा महसूल विभाग येत्या काळात देशात सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपत्तीग्रस्तांच्या घरातही …
Read More »
Marathi e-Batmya