Tag Archives: महसूल मंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार ५०० जणांना नियुक्तीचे आदेश महर्षी वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचे भूमिपूजन

सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सोलापूरच्या ९ हजार कुटुंबांच्या जागा ‘फ्री-होल्ड’ १९८९ च्या रेडी रेकनरच्या अवघ्या अडीच टक्के शुल्कात मिळणार मालकी हक्क

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा ११८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आणि अत्यंत जटील प्रश्न अखेर राज्य शासनाने मार्गी लावला आहे. सोलापूरमधील ‘बी-२’ प्रवर्गातील ८१३ मालमत्तांमधील तब्बल ९ हजार कुटुंबांना या जमिनी ‘फ्री-होल्ड’ (भोगवटादार वर्ग-१) करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, आदिवासींना हक्काचा सातबारा वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू

वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना १२ ई लागू करण्यात आला आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी बांधवांना याचा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, ख्रिश्चन मिशनरी संस्थांच्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी तीन महिन्यांत अहवाल तयार करणार

इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे सोडलेल्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी करून त्यांच्या मालकी हक्क, अभिलेख व त्यानंतर झालेल्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. सदस्य देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. महसूल …

Read More »

मुंबईतील ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील सोसायट्यांना सरकारचा दिलासा’ निवासीसाठी केवळ अर्धा तर व्यावसायिक मालमत्तांसाठी दीड टक्के मुद्रांक शुल्क, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई शहर आणि उपनगरातील ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनींवरील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्थांची अनेक दशकांपासूनची कोंडी अखेर राज्य सरकारने फोडली आहे. भाडेपट्टा करार नोंदणीकृत करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात सरकारने ऐतिहासिक कपात केली असून, आता निवासी मालमत्तांसाठी जास्तीत जास्त ०.५ टक्का आणि व्यावसायिक मालमत्तांसाठी १.५ टक्का एवढेच नाममात्र …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईटीएस (Electronic Total Station) सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, अत्याधुनिक मॉनिटरिंग व्यवस्था, कायद्यात सुधारणा आणि नवीन नियमावली आणण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभु यांच्या मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बीडमधील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहाराचे ७३ कोटी वसूल करणार भूसंपादनाच्या नावाखाली अवैधरित्या रकमेचे वितरण

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरीत करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या ‘मावेजा’ वाटपात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, कोल्हापूरच्या हेरे सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न निकाली भोगवटादार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर; रूपांतर मूल्य पूर्णपणे माफ

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील सरंजाम इनाम जमिनींचा तब्बल ५५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य शासनाने विशेष बाब म्हणून निकाली काढला असून, भोगवटादार वर्ग २ च्या जमिनींचे कोणतेही रूपांतर मूल्य न आकारता भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी स्वतंत्र टास्क फोर्स नाना पटोले यांच्या प्रश्नावर बावनकुळे यांचे उत्तर

महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची राज्यस्तरीय चौकशी आता अकाउंटंट जनरल (एजी) कार्यालयामार्फत केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय जाहीर केला. यावेळी सदस्य नाना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये लवकरच प्रशासकीय आणि लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न, हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी

राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने   प्रस्तावित ८८ नवीन महसूल कार्यालयांच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य शासनाने या कार्यालयांबाबत हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये १० अपर जिल्हाधिकारी कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये, २ तहसीलदार कार्यालये आणि ६९ …

Read More »