Tag Archives: रईस शेख

रईस शेख यांची माहिती, अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला कारभार अखेर मार्गी रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी

दिड वर्षापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असून नव्या वर्षात संस्थेचा कारभार गतीमान व्हावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. यासदंर्भात आमदार रईस …

Read More »

वंदे मातरम प्रश्नी आ. रईस शेख यांची संकल्पना भाजपाने उचलली, जाहिर केला स्वतःचा कार्यक्रम सर्वात आधी आमदार रईस शेख यांनी जाहिरपणे सर्व शाळांमध्ये कार्यक्रम घेण्याची केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यक्रम राबविण्याबाबतची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिले होते. तसेच याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही यावेळी केली होती. मात्र यावर राज्य …

Read More »

आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश, भूखंड सुपुर्द वित्तमंत्री अजित पवार यांचे उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन

भिवंडीमध्ये लवकरच शानदार ‘उर्दू घर’ उभे राहणार आहे. या प्रस्तावित उर्दू घरासाठी आवश्यक २५०० चाै. मी. भूखंड ठाणे जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे नुकताच सुपूर्त केला. भिवंडीत उर्दू घर उभे राहावे, यासाठी ‘भिवंडी पूर्व’चे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख सातत्याने पाठपुरावा करत होते. आमदार शेख यांच्या पाच वर्षाच्या पाठपुराव्याला …

Read More »

रईस शेख यांची मागणी, वीज दरवाढ मागे घेवून यंत्रमाग व्यवसायाला पॅकेज द्या वीज सवलतीसाठी यंत्रमाग ऑनलाईन नोंदणीची सक्ती मागे घ्या

अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के कर लादल्याने कापडाची निर्यात ठप्प असून त्यात पुन्हा महावितरण कंपनीने वीजदरवाढ लादली आहे. यामुळे राज्यातील आर्थिक संकटात असलेला यंत्रमाग व्यवसाय मृत्युपंथाला लागेल, अशी भीती व्यक्त करत वीजदरवाढ मागे घ्यावी आणि यंत्रमाग व्यवसायाला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी …

Read More »

आमदार रईस शेख यांची टीका, उर्दू अकादमीला निधी नाही पण जाहिरातीसाठी १० कोटी अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिले पत्र

राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवाच्या तीन दिवशीय कार्यक्रमाच्या प्रसिद्धीला अल्पसंख्यांक विभागाने मंजूर केलेल्या १० कोटी निधीवर समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी टीका केली. अकादमीला निधी देताना शासन हात आखडता घेते आणि प्रसिद्धीला मात्र उधळपट्टी करते, हा काय प्रकार आहे, अशी विचारणा आमदार शेख यांनी अल्पसंख्याक विकास …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, भायखळ्यातील ‘उर्दू शिक्षण केंद्र’ प्रकरणी बैठक बोलवा सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांना शासनाने बगल दिल्याचा केला आरोप

भायखळा मधील‘उर्दू शिक्षण केंद्र’चा निर्णय संबंधितांची बैठक घेवून करण्यात येईल, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले असतानाही महापालिका आणि पालकमंत्री यांनी ‘उर्दू शिक्षण केंद्रचा भूखंड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देवून विधानसभा अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा अवमान केला असून या प्रकरणी संबंधित लोकप्रतनिधींची बैठक बोलावावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी …

Read More »

भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा आरोप, महायुती सरकारने केला आश्वासनाचा भंग अल्पसंख्याक समाजाच्या संस्थाना सरकार सापत्न वागणूक देतेय

राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू …

Read More »

रईस शेख यांचा इशारा, अमेरिकन टॅरिफमुळे निर्यातीत घट, पॉवरलूम क्षेत्रावर संकट ऑर्डर कमी होत चालल्याने पॉवरलूम बंद पडण्याची भीती

अमेरिकेच्या ५०% टॅरिफचा सर्वात जास्त फटका वस्त्रोद्योग क्षेत्राला बसल्यानंतर, भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पॉवरलूम उद्योगावरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती मागितली आहे. भारताच्या कापड निर्यातीत याचे योगदान ६० टक्के आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस …

Read More »

अनाथ मुलांबाबत आमदार रईस शेख यांच्या प्रश्नावर मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन अनाथ बालकांना शिक्षण मोफत, नोकरीतही आरक्षणाची अमंलबजावणी

अनाथ विद्यार्थ्यांना मिळत नसलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर लाभ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने तत्काळ शासन निर्णय काढून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. यामुळे अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये १०० टक्के लाभ मिळणार …

Read More »

सपा आमदार रईस शेख म्हणाले, महाराष्ट्रात ७५ लाख उर्दू भाषिक, पण लोकराज्य उर्दूत नाही आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला मुद्दा

राज्य शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन कोणत्याही कारणाविना बंद करण्यात आले असून समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील उर्दू भाषिकांना शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ला (डीजीआयपीआर) ‘लोकराज्य’ची उर्दू आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, …

Read More »