आमदार रईस शेख यांची मागणी, रमजान पूर्वी भिवंडी महापौर निवडणूक लवकर घ्या महापौर निवडणुकीची तारीख कोकण विभागीय आयुक्तांकडून १८ फेब्रुवारी रोजी जाहिर

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (बीएनसीएमसी) येथील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करत भिवंडी पूर्व मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी रमजानपूर्वी महापौर निवडणूक लवकर घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना आवाहन केले.

आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, सतत होत असलेला विलंब राजकीय घोडेबाजाराला चालना देत असून लोकशाहीचे नुकसान करत आहे. पवित्र रमजान महिना १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीची तारीख तातडीने जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, महापौर निवडणुकीला होत असलेल्या विलंबामुळे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होत असल्याचा इशारा देत पुढे म्हणाले की, महापौर निवडणुकीची तारीख जाहीर व्हावी यासाठी मी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र ही प्रक्रिया अनावश्यकपणे लांबली असल्याचा आरोपही यावेळी केला.

आमदार रईस शेख यांनी विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देतील आणि आवश्यक ती कारवाई करतील असा विश्वास व्यक्त केला.

About Editor

Check Also

सिंचन प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *