Tag Archives: लाडकी बहिण योजना

आदिती तटकरे यांचे निवेदन, लाडकी बहिणीच्या २१०० रूपयांबाबत मुख्यमंत्री निर्णय़ घेतील राज्य सरकारवरील वाढत्या टीकेवरून महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री तटकरेंचे निवेदन

लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. तसेच दर महिन्याला १५०० रूपये देत विधानसभा निवडणूकीच्या कालावधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले. त्यानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प शपथविधीच्या वेळी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नाही

महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,….हे धाडस कुठून येते? गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना बंद होणार नाही महायुतीच्या सर्व ९ जागा विजयी करणाऱ्या नांदेडकरांचे मानले आभार

महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नांदेड येथे शिवसेनेकडून आयोजित केलेल्या आभार सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि येथे सत्याचाच विजय झाला. नांदेडी जिल्ह्यातील …

Read More »

दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....

आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोठे वक्तत्य, आता महिलांनी ठरवायचंय…. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते

राज्यात विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरु करत १५०० रूपयांची भुरळ महिलांवर घालत सरकारी पैशातून मते विकत घेतल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणूका होऊन जवळपास दोन महिने झाले. त्यातच राज्याच्या तिजोरीची अवस्था तोळामासाची होत आहे. त्यामुळे …

Read More »

निवडणूकीमुळे थांबलेली लाडकी बहिण योजना पुन्हा सुरू महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा यशस्वी प्रारंभ

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, बहिणींमध्ये आवडती नावडती करू नका २१०० रूपये देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करा

राज्य सरकारच्या तिजोरीवर येणाऱा भार कमी करण्यासाठी आता नव्याने सत्तास्थानी विराजमान झालेल्या महायुती सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच योजनेत नव्याने अटी व नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्ष्प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

विधानसभेत मंत्री उदय सामंत यांच्याकडून पुरवणी मागण्या सादरः लाडक्या बहिणीसाठी १४०० कोटी ३५ हजार ७८८ कोटींच्या मागण्या सादर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीने माझी लाडकी बहिण योजनेतील रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सोमवारी ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यात आपल्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेसाठी १,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावेळी पुरवणी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली…आता ‘लाडका भाऊ’साठी काम.. सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो, जनभावना पायदळी तुडवणे ही सत्तेची मस्ती

‘लाडकी बहिण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहिणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो …

Read More »