भिवंडी (पूर्व) येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून येत्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सशस्त्र दलांनी दिलेल्या जलद आणि निर्णायक प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव मांडण्याची मागणी केली …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या शाळेवर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील दयानंद आर्य कन्या संस्थेवर कठोर कारवाई करावी
नागपूरातील हिंसाचारानंतर धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य कन्या विद्यालया’ने प्रवेश नाकारले, त्या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांप्रती कोणताही धार्मिक भेदभाव करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकिद राज्यातील सर्व शाळांना देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »वक्फ बिलावरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांचा अमित शाह यांना चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरून अखिलेश यादव यांचा टोला
वक्फ विधेयकाचे सुधारीत विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या चर्चेच्या वेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्या भाजपाला …
Read More »अखिलेश यादव यांचा सवाल, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळच्या घटनेची माफी मागणार का? राजपूत शासक राणा सांगा, देशद्रोही, वक्तव्याचे अखिलेश यादव यांच्याकडून समर्थन
समाजवादी पक्षाचे खा रामजीलाल सुमन यांनी राज्यसभेत बोलताना राजपूत शासक राणा सांगा हा देशद्रोही असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे समर्थन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी समर्थन करत त्यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना “देशद्रोही” म्हटले होते. अखिलेश यादव यांनी टीका फेटाळून लावत असा युक्तिवाद केला की जर …
Read More »औरंगजेब वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अबु आझमी यांना न्यायालयाचा दिलासा अबु आझमींना अटकेपासून दिले संरक्षण
मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबु आझमी यांना सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या बाँण्डवर अटकेपासून संरक्षण दिले. औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी अबु आझमी यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्याप्रकऱणी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून अबु आझमी यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला …
Read More »समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी अखेर विधानसभेतून निलंबित अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी हे निलंबन कायम राहणार
मुघल शासक औरंगजेबाच्या उद्दातीकरण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना सध्या सुरू असेलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी विधानसभा सदस्यत्व निलंबित केले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्च रोजी संपेल. दोन दिवसांपूर्वी आझमी यांनी औरंगजेबाचे वर्णन एक उत्कृष्ट प्रशासक असे केले होते; या टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण …
Read More »नाना पटोले यांचे आव्हान, … कोरटकर व सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा भाजपाच्या मूळ विचारसरणीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान
भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा …
Read More »अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीचा तीव्र शब्दात धिक्कार..
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. याबाबत निवेदन …
Read More »विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप
विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …
Read More »
Marathi e-Batmya