Tag Archives: ajit pawar

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदला वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय निधी वितरणातील सुसूत्रता, अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहने, न्यायाधीशांना सुधारीत वेतनश्रेणी

मुंबई: प्रतिनिधी आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा …

Read More »

कोरोनामुळे अखेर उत्सवात दहीहंडी न फोडताच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …

Read More »

एकाच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्रातील चिपळूण, सोलापूरात जातीयवादाच्या दोन मोठ्या घटना चिपळूणात मागासवर्गीयांना निवारा लांब करायला लावला, तर माळशिरसमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीस करण्यास नकार

सोलापूर-रत्नागिरी-मुंबई: प्रतिनिधी फुले, शाहू आणि राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून उल्लेख केला जातो. मात्र याच महाराष्ट्रात एकाच महिन्यात जातीवादाच्या दोन घटना घडल्या असून त्यातील एक चिपळूण तर दुसरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे एका मातंग समाजाच्या व्यक्तीने अॅट्रोसिटी …

Read More »

जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्याबरोबर काँग्रेस आणि भाजपाही राहणार दूर

सातारा: प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची  सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील  यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार …

Read More »

कोरोना: २ री लाट आटोक्यात तर १८ ते ४४ वयोगटातील फक्त २५ टक्क्यांचे लसीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीवर झाली चर्चा

मुंबई: प्रतिनिधी सततच्या निर्बंधामुळे आणि नागरीकांच्या सजगतेमुळे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून नंदूरबारमध्ये आज चक्क एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया उत्तर महाराष्ट्रातील धुळे या सहा जिल्ह्यात १० पेक्षा रूग्ण कमी आढळून आले. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा तर विदर्भातील …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »

एमटीडीसीच्या रूम्स आता मेक माय ट्रीप, स्काय-हायसह वरुन बुक करता येणार एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड पर्यटक निवास, गणपतीपुळे येथे बोट क्लबचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि …

Read More »

अजितदादांच्या उपस्थित शरद रणपिसे, राज्यपालांचा अल्पसेंकदाचा संवाद पण महत्वाचा १२ आमदारांच्या नियुक्तीवरून झाला संवाद

पुणे : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिना निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज येथील विधान भवनात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा निरोप घेताना पुण्याचे खासदार गिरीष बापट, काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शरद रणपिसे यांच्यासह अनेक जण उभे होते. त्यावेळी राज्यपाल समोर येताच रणपिसे यांनी राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न उपस्थित …

Read More »

राज्यातील या पोलिस आणि पोलिस अधिकाऱ्यांना पदक जाहिर चार राष्ट्रपती तर ७० पोलिस पदके

नवी दिल्ली : प्रतिनिधी पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलीस शौर्य पदक  तसेच  प्रशंसनीय सेवेकरिता ४५ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  शौर्य पदक श्रेणीमध्ये  ६३०  व  सेवा …

Read More »

अजित पवारांनी याप्रश्नी थेट पंतप्रधान मोदींना केली विनंती सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावी

मुंबई: प्रतिनिधी सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. मुंबईसह …

Read More »