मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतच असताना या आजाराच आगामी काळात पराभूत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यातील अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून बैठकीला हजेरी लावली. मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव …
Read More »पर्वत आणायला गेल्यासारखे जाऊ नका, नाहीतर पोलिसरूपी हनुमान घेवून जातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. तरीही लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने जसा औषधी झाडासह पर्वत आणला तसे आणण्यासाठी बाहेर पडला तसे बाहेर पडू …
Read More »शरद पवारांकडून पहिल्यांदाच भक्तांच्या आयटी सेलचा उल्लेख व्हॉट्सअँपच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे आयोजन आहे का?
मुंबई: प्रतिनिधी आज सर्व सामाजिक स्तरावर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये. टेलिव्हिजनवर बघतो, त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत. काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात …
Read More »तिसऱ्या टप्प्यात प्रवेश, लॉकडाऊन वाढणार ? मे-जून पर्यत वाढण्याची शक्यता
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉकडाऊन जाहीर केले. मात्र सुशिक्षत असूनही अडाणी व्यक्तीसारख्या वागणाऱ्या नागरिकांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आपण आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या आजाराचा आणखी प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »दोनच आव्हानं, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
मुंबई : प्रतिनिधी कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे …
Read More »‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …
Read More »कोरोना प्रतिबंधक वस्तूंवरील GST माफ करा आणि लढ्याला बळ द्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘३ प्लाय मास्क’, ‘एन 95- मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स्’, ‘टेस्टींग किट्स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवाकरातून (GST) सूट देण्याची अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली. हा …
Read More »अजित पवार म्हणाले, कोरोना पासूनच्या बचावासाठी फक्त दोनच उपाय स्वेच्छेनं क्वारंटाईन होवून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचविण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा …
Read More »…. आता खैर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. …
Read More »आमदारानेच बांधली मशीन पाठीवर, अन् केली निर्जंतुकीकरणाची फवारणी जनतेच्या सुरक्षेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर
अहमदनगर: प्रतिनिधी जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: पाठीवर मशीन बांधून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना …
Read More »
Marathi e-Batmya