Tag Archives: bjp government

हर्षवर्धन सपकाळ यांचे गणरायाला साकडे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री व सरकारला दे.. राहुल गांधींना स्टँडअप कॉमेडियन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले, गेट वेल सून देवेंद्रजी

राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. …

Read More »

नंदीग्राममधील काँग्रेसच्या उमेदवाराला ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा देताच अटकेची कारवाई पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई

२००७ मधील जमीन संपादनाविरोधातील आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना शुक्रवारी पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पक्षाच्या राज्य शाखेने दिली. विशेष म्हणजे नंदीग्राम पोटनिवडणुकीत आपला गट त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केल्यानंतर काही तासांतच ही अटक करण्यात आली. नंदीग्राममधील प्रस्तावित …

Read More »

केंद्र सरकारचे कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेचे आमंत्रण तुमच्या सोयीने आणि वेळेनुसार सरकार चर्चेस तयार असल्याची मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

२० जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेल्या “पोलिसांच्या क्रूरते” विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असताना, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मोठ्या प्रयत्नात केंद्र सरकारने गुरुवारी त्यांना त्यांच्या “सोयीनुसार” आणि “कोणत्याही वेळी” चर्चेसाठी पुन्हा आमंत्रित केले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, सरकारने गेल्या २४ तासांत “आमच्या …

Read More »

सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …

Read More »

काँग्रेसने मर्जी दाखवलेल्या खाजगी अभिमत विद्यापीठावर आता भाजपाचीही मर्जी ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला १५ एकर जमीन

काही वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राज्यात खाजगी विद्यापीठांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ॲमिटी विद्यापीठालाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसकडून अधिवेशन संपण्याच्या एक-दोन दिवस आधी संध्याकाळी विधानसभा आणि विधान परिषदेत त्याविषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच त्यानंतर काही वेळातच ॲमिटी विद्यापीठाला खाजगी अभिमत विद्यापीठाचा …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा सहकारी बँकांमध्ये स्थानिक तरुणांसाठी ७०% आरक्षण ३१ जिल्हा सहकारी बँकांना आदेश लागू

महाराष्ट्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (डीसीसी बँका) भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, आता ७० टक्के पदे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असतील. हा सरकारी आदेश राज्यातील सर्व ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू होईल. …

Read More »

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?

स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

अमित शाह यांची घोषणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल मध्ये २०२५ मध्ये सरकार स्थापन करणार भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचा कार्यकर्त्यांसमोर केला विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ८ जून २०२५ असे प्रतिपादन केले की एनडीए तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करेल. द्रमुकच्या भ्रष्ट राजवटीचा तामिळनाडूतील गरीब, महिला आणि मुलांवर परिणाम झाला आहे, असा आरोप शाह यांनी केला आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रविड पक्षाच्या सरकारला सत्तेच्या खुर्च्यावरून उलथवून टाकण्याचा …

Read More »