हर्षवर्धन सपकाळ यांचे गणरायाला साकडे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री व सरकारला दे.. राहुल गांधींना स्टँडअप कॉमेडियन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले, गेट वेल सून देवेंद्रजी

राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. गणपती बाप्पा, या सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी दे, अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धऩ सपकाळ पुढे म्हणाले की, सरकार फक्त प्रक्रिया सुरु आहे एवढेच सांगत आहे. पण ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करत नाही. महायुती सरकारने कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मात्र सरकार चालढकल करत आहे. कर्जमाफी केली तीही फसवीच निघाली. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्याच्या बैठकीत अधिकारी व्हिडिओ पहात असतात, तर सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात आहेत. सरकारने लाजलज्जा सर्व सोडून दिले आहे, त्यांना कशाचेही गंभीर्य राहिलेले नाही. विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळणारा कृषी मंत्री याआधी राज्याला लाभला होता, आता अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ पहात बसतात, यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे राहिलेले नाही.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, तरुणाई राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, हे चित्र भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारे आहे. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता व ते सरकारला थेट जाब विचारत असल्याने भाजपा नेते राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप व टीका करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी स्टँडअप कॉमेडियनचे काम करावे अशी केलेली टीका, ही त्याचाच एक भाग आहे. फडणवीस यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांना मी गेट वेल सून देवेंद्रजी, एवढेच म्हणतो, असा टोलाही यावेळी लगावला.

शेवटी बोलताना हर्षवर्धऩ सपकाळ म्हणाले की, इंग्रजांनी ज्याप्रमाणे तोडाफोडा व राज्य करा निती अवलंबली होती त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सरकार आरक्षणाच्या नावाखाली समाजातील विविध जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. मराठा-ओबीसी, आदिवासी, व्हिजेएनटी अशी भांडणे लावली जात आहेत. नाहीरे वर्गाला हात देण्याचे काम आहेरे वर्गाने करायला हवे, अशीही भूमिका यावेळी मांडली.

About Editor

Check Also

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल पदवी हातात, नोकरी कुठे? रिक्त सरकारी पदांची भरती कधी?: झीनत शबरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत असताना, मुंबई युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *