देशातील ८८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, मागास आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व मीडिया, न्यायपालिका, प्रशासनासह सर्वच क्षेत्रात अत्यंत कमी आहे. नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण ते ओबीसी नाहीत, ते जनरल कोट्यातले होते, गुजरात सरकारने कायदा बदलला त्यानंतर ते ओबीसी झाले. पण महत्वाचा प्रश्न आहे की, नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय …
Read More »जयराम रमेश यांचा हल्लाबोल इलेक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार… ‘चंदा दो, धंदा लो’
इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या …
Read More »जयराम रमेश यांचा हल्लाबोल, मोदी सरकारची एकच निती ‘चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान’
मोदी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कायदे २७ सप्टेंबर २०२० रोजी आणले होते, परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनापुढे त्यांना झुकावे लागले आणि अखेर ते तीन काळे कायदे वापस घ्यावे लागले. यासाठी १५ महिन्यांचे आंदोलन व ७०० शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले आणि १९ नोव्हेंबर २०२१ रोजी हरित क्रांतीच्या प्रणेत्या दिवंगत पंतप्रधान …
Read More »वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना केला सुपुर्द
साधारणतः २०१९ साली देशात भाजपाच्या बहुमताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन पध्दती लागू करण्याची योजना मोदी यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा जाहिर केली. त्यानंतर जून्या संसदेतील शेवटच्या अधिवेशनाच्या कालावधीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली वन नेशन वन इलेक्शन संकल्पना देशात राबविण्यासाठी समितीची स्थापनाही …
Read More »शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी
राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी …
Read More »जयराम रमेश यांचा टोला, राहुल गांधींनी ‘गॅरंटी’ शब्द वापरल्यामुळेच ‘मोदी गॅरंटी’ सुरु
भारत जोडो न्याय यात्राचे पाच न्याय स्तंभ आहेत व १४ जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी न्याय, युवा न्याय, भागिदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्या आहेत. पाच गॅरंटीमधून काँग्रेसचा हा २० कलमी कार्यक्रम असून ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. राजकीय शब्दकोषात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिली …
Read More »काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार आहेत, असे सूचक भाष्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी यावेळी केले. भाजपा …
Read More »हरियाणामध्ये फटका नको म्हणून मनोहरलाल खट्टर यांना हटविलेः नायब सिंगे सैनी नवे मुख्यमंत्री
मागील काही महिन्यापासून केंद्र सरकारच्या विरोधात पंजाब, हरियाणा चंदीगढ राज्यातील शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमतीच्या प्रमुख मागणीवरून आंदोलन छेडले. केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी हरियाणा मार्गे शंभू बॉर्डरवर पोहोचलेल्या सरकारवर पुन्हा एकदा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आदेशान्वये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ईडीच्या कारवाईत भाजपाचा नेता…
ईडी हा भाजपाचा सहकारी पक्ष असून त्यांच्यामार्फत विरोधकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमधून केला. शरद पवार म्हणाले की, या देशातील केंद्रीय यंत्रणांचा वापर निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या …
Read More »ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहिर
एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …
Read More »
Marathi e-Batmya