रामदास आठवले भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी १२ एप्रिलपासून उत्तर भारतात

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एनडीएचे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक आहेत. देशभर सर्व राज्यांत भाजपा उमेदवार आपल्या प्रचारासाठी रामदास आठवले यांची सभा आयोजित करीत आहे.

दलित बहुजनांचे लोकप्रिय राष्ट्रीय नेतृत्व एक सेलिब्रिटी वलय लाभलेला चेहरा म्हणजे रामदास आठवले असून संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे देशभर रामदास आठवले यांना भाजपा उमेदवार प्रचारासाठी निमंत्रित केले जात आहे.

रामदास आठवले येत्या १२ एप्रिल रोजी छत्तीसगड मधील रायपूर येते भाजपा उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. १३ एप्रिल रोजी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे भाजप उमेदवाराचा ते प्रचार करणार आहेत. तर १४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संसदेत आयोजित कार्यक्रमात रामदास आठवले उपस्थित राहतील. तसेच त्याच दिवशी १४ एप्रिल रोजी दुपारी रामदास आठवले मुंबईत चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणार आहेत.

त्यानंतर १५ एप्रिल रोजी रामदास आठवले हे आसाम चा दौरा करणार असून आसाम मध्ये हेलिकॉप्टर द्वारे रामदास आठवले प्रचार दौरा करणार आहेत. आसाम मध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५ उमेदवार लोकसभा निवडणुक लढत आहेत. त्यानंतर १७ एप्रिल रोजी रामदास आठवले राजस्थान मधील जयपूर मधील भाजपा उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *